भारत देशात एखाद्या व्यक्तीला समोरच्या “व्यक्तीच्या” किंवा “व्यक्तींच्या समूहांच्या” विचारधारा(Ideology) नुसार जगण्यास आवडत नसेल आणि त्याला त्याच्या स्वतंत्र विचारधारा(चांगली) नुसार जगण्यास आवडत असेल तर त्याला “वाईट व्यक्ती” किंवा “बिघडलेला माणूस” अशी उपमा दिली जाते। भारत देशातील घरातल्या परिस्थिती मध्ये पण काही अशीच गोष्ट बघायला मिळते। भारत देशातल्या भरपूर आईबापांना त्यांचा मुलगा असो व मुलगी हे आपले विचारधारेच्या गुलाम(slave) असायला हवे असेच वाटते मग ते विचारधारा कितीही अतार्किक(illogical) आणि तत्यहीन(factless) असेल तरीही। आईबाप करतात तेच खरे, तेच चांगले, तेच सर्वश्रेष्ठ, तेच जगमान्य मग ते कितीही चुकीच्या आणि अंध विचारसरणी बाळगून केले तरीही आणि त्यांचाच मुलगा किंवा मुलगी एखादा कार्य चांगल्या आणि वैज्ञानिक(scientific) विचारधारा ठेवून केली असेल तरीही ते वाईट किंवा असंस्कृतच ह्या भारत देशातील लोकांसाठी। भारत देशातील भरपूर आईबापांना आपला मुलगा किंवा मुलगी जन्माला आले की 'हा' किंवा 'ही' फार मोठी व्यक्ती व्हावे असे वाटते पण जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला तो यश संपादन करण्यासाठी जो मानसिक, वैचारिक आणि व्यक्ती स्वातंत्र्याची गरज असते ते मात्र मिळत नाही मग अश्यात 'तो' किंवा 'ती' “आपल्या परिवाराचा मान उंचावल पाहिजे” अशी अपेक्षा ठेवणे तर किती योग्य? ह्या वर समर्पक उत्तर मिळणे थोडं कठिणच। एक गोष्ट हे ही सांगणे आवश्यक वाटते कि ज्यांना ज्यांना वैचारिक आणि व्यक्ती स्वातंत्र्य घरातून आणि समाजातून मिळाले ते सर्वजण प्रख्यात व्यक्तिमत्वे झाले आणि ह्या देशाला आदर्श बनले। वैचारिक गुलाम ठेवणे ही बाब अगदीच आता देशातील लगबग सर्व क्षेत्रात पोहचली आहे। एकंदरीत जो वैचारिक गुलाम आहे तोच चांगला आणि जो आपल्या स्वतंत्र विचाराने जीवन जगतो तो वाईट अशी विचारसरणी आपली भारतीय समाज संस्थेने पिढ्यानपिढ्या वाढवली आहे आणि म्हणूनच भारताला लाभलेले भरपूर थोर समाजसुधारकांना आणि त्यांच्या सद्विवेक विचारांना फारसा महत्वाकांक्षा मिळताना दिसला नाही। बाकीच्या देशांमध्ये मात्र अशी गोष्ट होत नाही। बाकीचे देश तथ्ये(facts), तार्किक विचारे(logical thoughts), शाश्वत विचारधारा(sustainable ideology) आणि व्यावहारिक शक्यता(practical possibility) ह्या सर्व बाबी समोर ठेऊन देशात विकासकामे करतात आणि कदाचित हेच कारणे आहेत ते कालांतराने भारतापेक्षा जास्त सक्षम होत राहिले आणि होत आहेत। संपूर्ण जगातला सर्वश्रेष्ठ स्पर्धा ओलिंपिक(Olympic) येथे ही भारताची कामगिरी सांगण्यासारखं काही विशेष नाही। अमेरिका, चीन, रशिया सारखे देश ओलिंपिक स्पर्धेत एकाच हंगामात(season) शेकडो सुवर्ण पदक मिळवतात पण आपल्या भारत देशाला एक सुवर्ण पदक मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो। सांगण्याचा तात्पर्य इतकाच की एखाद्या व्यक्तीला यश संपादन करण्यासाठी पहिल्यांदा घरातून आणि मग समाजातून “व्यक्ती स्वातंत्र्य” मिळणे खूप गरजेचे आहे। संक्षेपार्थ, भारताला भौतिक(physical) स्वातंत्र्य मिळाले पण मानसिक(mentally), वैचारिक(ideological) आणि व्यक्ती स्वातंत्र्य(freedom of the individual) मिळालेले दिसत नाही। वेळेस न मिळालेली व्यक्ती स्वातंत्र्य परिवाराला, समाजाला आणि देशाला मागे नक्कीच ठेवतील। व्यक्त होण्यासाठी भरपूर काही असले तरीही सर्व काही ह्या एका लेखात सांगणे अशक्यच। असो, फार मोठं न वाढवता माझ्या काही विचारांना तुमच्या समोर ठेवत आहे।
– निखिल
Comments
Post a Comment